शेअर मार्केट म्हणजे सट्टा-जुगार ?
शेअर मार्केट म्हणजे सट्टा-जुगार असे समीकरण भारतामध्ये तयार झाले आहे, पण खरच शेअर मार्केट म्हणजे सट्टा आणि जुगार आहे?
आपल्या भारतामध्ये "शेअर" मार्केटला सट्टा आणि जुगार म्हटले जाते कारण लोकांना शेअर मार्केट म्हणजे काय हे अजून समजले नाही.
बाकीच्या देशांच्या तुलनेत आपल्या भारतामध्ये फक्त १० ते १५ टक्केच लोक शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करतात. पण त्यातील फक्त पाच टक्के लोकच यशस्वी होतात मग एवढे प्रमाण कमी कसे काय तर याचे कारण आहे लोकं शेअर मार्केटमध्ये प्रॉपर,व्यवस्थित अभ्यास न करता शेअर्स मध्ये गुंतवणूक करतात किंवा दुसऱ्यांचे ऐकून दुसऱ्यांच्या टिप्स घेऊन शेअर बाजार मध्ये गुंतवणूक करतात परिणामी त्यांना नुकसानीचा सामना करावा लागतो. आणि मग लोक शेअर मार्केटला दोष देतात पण जर त्यांनी व्यवस्थित अभ्यास करून, न्यूज चा अभ्यास करून जर गुंतवणूक केली तर त्यांना नुकसान होण्याची शक्यता खूप कमी असते.
योग्य मार्गदर्शन आणि योग्य अभ्यास करून जर शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक केली तर शेअर मार्केट एवढा पैसा कुठेही नाही. कारण शेअर मार्केटमधून कमी पैशांमध्ये जास्त नफा होण्याची शक्यता असते.
शेअर मार्केटला सट्टा-जुगार यामुळे म्हणले जाते.
1 दुसऱ्यांच्या टिप्स वर काम करणे.
2 स्वस्तात मिळतात म्हणून कोणतेही क्वालिटी नसलेले शेअर्स घेणे.
3 चुकीच्या वेळी चुकीची इंट्री घेणे.
4 न्यूज चा अभ्यास न करणे.
5 मिळालेल्या प्रॉफिट वर समाधान न मानता अधिक प्रॉफिट मिळण्याची लालसा ठेवणे.
6 चांगले शेअर्स महाग आहेत म्हणून स्वस्तातले शेअर खरेदी करणे.
7 पडत्या मार्केटमध्ये घाबरून आपल्या जवळचे सगळे शेअर विकून टाकणे.
8 जेव्हा मार्केट महाग असते तेव्हा जास्त किमतीला शेअर्स विकत घेणे आणि जेव्हा मार्केट पडते तेव्हा कमी किमतीला शेअर्स विकणे.


Comments
Post a Comment